फेसबुकवरच्या चॅलेंज ट्रेंडच्या नादी लागू नका; जिल्हा पोलीसांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । फेसबुकवरच्या चॅलेंज ट्रेंडच्या नादी लागू नका असे आवाहन तमाम जनतेला जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या फेसबुकवर कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज , सिंगल चहलेन्ज, डॉटर चॅलेंज असे ट्रेंड्स चालू आहेत. अशा ट्रेंड्समुळे प्रभावित होऊन लोक त्यांचे पत्नी, कुटुंबीयांसोबतचे फोटो विनाकारण व्हायरल करतात. मात्र अशा फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. अशा चॅलेन्जमुळे सायबर गुन्हेगारांना लोकांचे परिवारासोबतचे फोटो सहज मिळू शकतात. सायबर गुन्हेगार अशा प्रकारचे फोटो सहज मिळवून त्यांचा गैरवापर करीत तुम्हाला मानसिक, शारीरिक अथवा आर्थिक त्रास देऊ शकतात त्यामुळे याबद्दल सगळ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .

Protected Content