Home Cities जळगाव मोठी बातमी : जिल्हा बँकेत महायुतीच्या तीन जागा बिनविरोध ; पारोळा, एरंडोल...

मोठी बातमी : जिल्हा बँकेत महायुतीच्या तीन जागा बिनविरोध ; पारोळा, एरंडोल व भुसावळातून झाली सरशी !

0
36

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश लाभले असून आज निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक जागा बिनविरोध झाल्या असून या माध्यमातून महायुतीने दमदार सुरवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. यात दुपारी तीन वाजेची मुदत उलटून गेल्यानंतर महायुतीच्या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात पारोळा सोसायटी मतदाररसंघातून नलीनी चिमणराव पाटील तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. यातील नलीनी पाटील या आ. अमोल पाटील यांच्या मातोश्री तर मृणाल पाटील या सौभाग्यवती आहेत. अर्थात, जिल्हा बँकेत माजी आ. चिमणराव पाटील यांच्या पत्नी तर आ. अमोल पाटील यांच्या जागी त्यांच्या सौभाग्यवती संचालक म्हणून काम पाहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई संजय सावकारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे मंत्री सावकारे यांच्या जागी त्यांच्या पत्नी या जिल्हा बँकेच्या संचालिका बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिन्ही जागांच्या माध्यमातून महायुतीचे जिल्हा बँकेतील खाते खुलले असून आता उर्वरित जागांसाठी लढत होणार आहे. अर्थात, माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound