जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

two wheeler theft

जळगाव प्रतिनिधी । अपार्टमेंटच्या पार्किंगमधून लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज दि.12 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती असे की, गणेश कॉलनी परिसरातील रामकृष्ण अपार्टमेंटच्या पार्किंगमधून राजेंद्र बाबुलाल अग्रवाल हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. शनिवारी 9 नोव्हेबर रोजी रात्री 8.30 त्यांची मुलगी रक्षा हिने मोपोड गाडी एमएच 19 एए 7726 अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली. दुसऱ्या दिवशी रविवारी 10 रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राजेंद्र हे कामावर जाण्यासाठी पार्किंगजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. आजू-बाजूला शोध घेतल्यानंतर दुचाकी मिळून न आल्याने ती चोरीला गेल्याची खात्री त्यांना झाली. अखेर मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content