भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आयटीआय समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी देवून मोबाईल हातातून हिसकावून नेल्याची घटना २२ जून रात्री १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २९ जून रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की. अनिकेत अमृत गुंजाळ वय २५ रा. वांजोळा रोड भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २२ जून रोजी रात्री १०.३० वाजता जुन्या वादातून भुषण संजय पाटील, जितेंद्र संजय पाटील, संजय रामिंसग पाटील आणि मनोज विजयसिंग पाटील सर्व रा. चोरवड ता.भुसावळ यांनी भुसावळ शहरातील आयटीआय कॉलेजजवळ यांनी अनिकेत याचा रस्ता आडविला आडविला. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ करत त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अनिकेत याने रविवारी २९ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुषण संजय पाटील, जितेंद्र संजय पाटील, संजय रामिंसग पाटील आणि मनोज विजयसिंग पाटील सर्व रा. चोरवड ता.भुसावळ या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश चौधरी हे करीत आहे.