‘कमल फाउंडेशन’तर्फे जामनेरात गुण गौरव सोहळा


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कमल फाउंडेशन तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा पार पडला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सौ.साधनाताई महाजन तर मार्गदर्शक म्हणून नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जे.के, चव्हाण, भाजपा जिल्हा महामंत्री आतिश झाल्टे, नामदार गिरीशभाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, कमल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे, सचिव सौ. कमलबाई भागवत भोंडे, भागवत भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आलेल्या मान्यवरांचे स्वागत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे, सचिव सौ. कमलबाई भोंडे यांनी शाल श्रीफळ देऊन केले. आपल्या प्रास्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे माहिती देताना म्हणाले की २०११ साली फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली. स्थापनेनंतर वैद्यकीय शिबिरे घेऊन गोरगरीब गरजू रुग्णांचे मोठ-मोठे ऑपरेशन मोफत करण्यात आले. कमल फाउंडेशन तर्फे ऑक्सिजन युक्त ॲम्बुलन्स सेवा मोफत सुरू असून अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. कमल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपक्रम आपण राबवित असून समाजातील विविध घटकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा मानस आहे असेही डॉक्टर प्रशांत भोंडे शेवटी म्हणाले.

मुख्य मार्गदर्शक नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की एआय तंत्रज्ञान बेरोजगार निर्माण करणारे असून हे टेक्निक पुढे आल्यास तरुणांना रोजगार मिळणार नाही. समाजापुढे हे सर्वात मोठे आव्हान असून याच्याशी नव्या पिढीला लढावे लागणार आहे. तरुणांनी डॉक्टर ,इंजिनियर होऊन बेरोजगारांची फौज निर्माण होते. याची जाणीव ठेवून इंजिनिअर डॉक्टर या क्षेत्राकडे न वळता स्पर्धा परीक्षा कडे वळून आयएएस अधिकारी व्हावे असेही मोलाचे मार्गदर्शन जयदीप पाटील यांनी केले.

या कार्यक्रमात कुमारी चैताली नरेंद्र जंजाळ यांनी फॉरेन्सिक लॅब परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास टू अधिकारी पदी त्यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . यावेळी त्यांच्यासोबत वडील नरेंद्र जंजाळ, आई सौ. मीराबाई जंजाळ उपस्थित होत्या. तसेच दहावी बारावी व पदवी, पदवीधर परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र घेऊन त्यांनाही गौरविण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प.स. सदस्य अमर पाटील, नगरसेवक सुहास पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे ,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर हर्षल चांदा, संतोष बारी, डॉक्टर नंदलाल पाटील ,भाग्योदय कलेक्शनचे संचालक प्रकाश पाटील, डॉक्टर जयंत महाजन, प्रशांत सरताळे, राजेश पाटील, योगेश मोते आदी मान्यवर उपस्थित होते.