अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील पीक संरक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
दिनांक २७ रोजी येथील पीक संरक्षण सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे मतदान झाले. यावेळी सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले असून गेल्या पंचवीस वर्षापासून ही निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २५ उमेदवारांनी नाम निर्देशन भरले होते. यात सर्व साधारण जनरल मतदार संघात संजीव पांडुरंग बिरारी, सुरेश किसनराव लाड, प्रताप विठ्ठल महाजन, मनोहर पंडित पाटील, भीमराव दौलत पवार, नेहरू रामदास पवार, राजेंद्र रंगराव पवार सुनील गुलाबराव पवार तर विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात एकनाथ सुकलाल लोहार, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात सुनील भास्कर गव्हाणे यांचा विजय झाला आहे.
इतर मागासवर्गीय मतदार संघात पवार अशोक प्रभाकर, महिला राखीव मतदार संघात शिलुबाई रवींद्र पवार, निशाबाई दौलतराव लाड यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांनी काम पाहिले तर या सहकार पॅनलला एक हाती सत्ता मिळवून देण्यासाठी पॅनल प्रमुख संदीप राव पवार, माजी सरपंच प्रवीण बिरारी, अजबराव सूर्यवंशी , कांतीलाल चौधरी , हिरामण चौधरी , सुभाष पवार , चंद्रशेखर पवार, राहुल पवार , विनोद पवार , मेघराज सूर्यवंशी, सोपान लोहार, दीपक पवार, मंगेश पवार, अमित पवार,प्रवीण लाड, दिलीप पाटील दापोरी ,प्रल्हाद पाटील, भूषण पवार यांचे सहकार्य लाभले.