लढवय्या आमदारांना भाजपचा विजय समर्पित-फडणवीस

पिंपरी/पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आजारातून पूर्णपणे बरे झालेले नसतानाही अतिशय कठीण अवस्थेत भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन आमदारांनी मतदान केले, त्यांतून भाजपच्या उमेदवाराचा झालेला हा विजय त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमप्रसंगी दिली.

राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा लढवय्ये आ. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचा आहे. आ.जगताप यांना दीड महिन्यांच्या उपचारानंतर गेल्या आठवड्यात रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अजूनही ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत व घराबाहेरही पडत नाहीत. त्यांना भेटण्याची देखील कोणालाही परवानगी नाही. तसेच प्रत्येक मताचे महत्त्व असताना आणि शरीर साथ देत नसतानाही मुक्ता टिळक यांनीही मतदानात सहभाग घेतला. अटीतटीच्या लढतीत भाजपचा तिसरा उमेदवारही निवडून आला. त्यामुळे भाजप वर्तुळात जल्लोष सुरू भाजपचे हे यश, आ. जगताप तसेच टिळक यांच्या लढवय्येपणाचे आहे. हा विजय त्यांना समर्पित करत असल्याचे फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!