हि तर छोटी लढाई, मोठी लढाई बाकी आहे – फडणवीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीनही उमेदवारांनी बाजी मारली, हि तर छोटी लढाई होती, पुढे मुंबई पालिकेसह राज्यावर भगवा लावायचा आहे, हे लक्षात ठेवा असा उत्साहपूर्ण सल्ला भाजपचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आलेत. हि तर लहान लढाई होती. आता तर सुरुवात झाली असून मोठी लढाई अजून पुढे आहे. येत्या काळात मुंबई महापलिकेवर भगवा लावायचा आहे हे लक्षात ठेवा. या सरकारला अजून दणके देऊ. कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवत जल्लोष करा, पण नम्रता सोडू नका हे लक्षात ठेवा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.

भाजपच्या या विजयामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर अनेक पिसाळले पण असतील. शिवसेनेला कोणी मत दिले नाही हे त्यांना माहितही असेल तरी हे काही करू शकत नाहीत. भाजपला मदत करणाऱ्यांवर कारवाई केली तर माविआतील अनेक जण सोडून जातील, असा विरोधकांना इशारा दिला असून २०२४ ला केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता येणार. यावर विश्वास असल्याचेहि फडणवीस यांनी म्हटले आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!