मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावणार – फडणवीस

मुंबई प्रतिनिधी ।  राज्य सरकारने कोरोनाबाबत आवश्यक ती पावले न उचलत केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचे प्रतिपादन आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

आज सायंकाळी मुंबईत भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीची बैठक झाली. यात बोलतांना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशभरात कोरोनाच्या केसेस कमी होत असतांना महाराष्ट्र सरकार आपलीच पाठ थोपटून घेत आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या काळात यासाठी उपाययोजना करण्यापेक्षा कंत्राटांमध्ये मलीदा कसा मिळेल याकडे सत्ताधार्‍यांचे लक्ष होते. आमचे सहकारी एका पुस्तीकेच्या माध्यमातून कोरोना काळातील भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील सरकारने वीज ग्राहकांना तगडा झटका दिला आहे. लोकांना अव्वाच्या सव्वा बिले आलेली आहेत. यावरून आम्ही जाब विचारला असता आधी ग्राहकांना माफी व नंतर सवलती देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले. तर आता मात्र ग्राहकांना बील भरायला सांगितले जात असल्याबद्दल फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

Protected Content