बारामतीतील पुढचा खासदार भाजपचाच ! : बावनकुळे

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीत भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामतीच्या दौर्‍यावर असून त्यांनी पवार यांच्या विरोधात जाहीरपणे दंड थोपटले आहेत. प्रत्येक निवडणुकीत पवार कुटुंबाच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरी येथील हनुमानाच्या मंदिरात फुटतो, तिथेच बावनकुळे यांनी दर्शन घेऊन पवारांच्या विरोधातील मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार कुटुंब आणि महाविकास आघाडीवर जोरदार टिकास्त्र सोडले. २०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य असेल, असा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आमच्या युतीच्या बळावर आम्ही निवडून आणू. जनता ही विश्वासघात करणार्‍यांना बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचं रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना जनता मदत करेल ही आम्हाला अपेक्षा आहे, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

दरम्यान, २०२४ मध्ये बारामतीत भाजपच विजयी होणार. २०० आमदार आणण्याच लक्ष्य. असा दावा ठोकत जनता आम्हाला कौल देई याची खात्री असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली. आता बारामतीचा गड उध्वस्त होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Protected Content