डॉ. नि. तु. पाटील विद्यापीठात प्रथम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वारे घेण्यात आलेल्या पदवीत्तर डिप्लोमा इन मेडिकल जुरीस्प्रुडन्स आणि टॉक्सिकॉलॉजी या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ.नितु पाटील यांनी विशेष प्राविण्य संपादन करत विद्यापीठात प्रथम आल्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.

जळगांव येथील खान्देश कॉलेज शिक्षण सोसायटी संचलित एस. एस.99 मणियार विधी कॉलेज मधुन त्यांनी पदवीत्तर डिप्लोमा इन मेडिकल जुरीस्प्रुडन्स आणि टॉक्सिकॉलॉजी या विषयासाठी भरती झालं होते.यावेळी त्यांना प्रो. डॉ. विजेता सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याआधी देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीत्तर डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयात ते विद्यापीठात प्रथम आले होते. डॉ. नितु पाटील यांचे खान्देश कॉलेज सोसायटी अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, विधी कॉलेज अधिष्ठाता डॉ. बी. युवाकुमार रेड्डी आणि सर्व कॉलेज स्टाफ द्वारे अभिनंदन होत आहे.

 

 

Protected Content