कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ४३ रूग्ण बाधित आढळले; १६९ रूग्ण कोरोनामुक्त !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. विशेष म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्हानिहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, जामनेर-४, रावेर-२, पारोळा-१, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ असे एकुण ४३ रूग्ण आढळून आले आहे.

आज दिवसभरात पन्नासच्या आत आकडेवारी आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजवर एकुण १ लाख ४२ हजार ७२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ४१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ९१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

Protected Content