मुंबई (वृत्तसंस्था) सत्तेत भाजपाने सगळी मंत्रिपदे घ्यावीत. पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेचाच मिळायला पाहिजे, अशी रोखठोक भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.
एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, मुद्दा हा खात्यांचा नसून मुख्यमंत्रिपदाचा आहे. शिवसेनेला मलईदार खाती पाहिजेत, असे बोलले जाते, पण आम्ही बाळासाहेबांनी उभी केलेली मध्यमवर्गीय माणसं आहोत. आम्ही आमदार, खासदार, मंत्री होऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते रस्त्यावरच काम करणार, असे राऊत म्हणाले. तर भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी भाजपने सगळी मंत्रीपदं घ्यावीत, पण मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच द्यावे , असे वक्तव्य केले.