खड्डयांंभोवती रांगोळी काढून शिवसेनेतर्फे अनोखे आंदोलन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 04 at 5.20.07 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील रस्त्याची पावसाने चाळणी केली आहे. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. याठिकाणी रांगोळी काढून सबका साथ फिर भी जळगाव भकास असा प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांचा शिवसेनेतर्फे आज निषेध करण्यात आला.

शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना मानेचे, पाठीचे आजार होत असून महापौर यांचे पती तथा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना देखील खड्ड्यात पडल्याने दुखापत झाली आहे. शहरात खासदार, आमदार, नगरसेवक भाजपचे असतांना शहराचा विकास झाला नाही. सबका साथ सबका विकास घोषणा दिली होती परंतु सबका साथ फिर भी जळगाव भकास अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोप आज शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजनान मालपुरे यांनी केला. पालकमंत्री गिरीश महाजन व आ. भोळे यांनी महापालिका निवडणूकीत वर्षभरात विकासाचे स्वप्न दाखवले होते. मात्र, वर्षभरात विकासाचे कोणतेही काम झाले नसल्याचा मालपुरे यांनी सांगितले. शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर शेजारील खड्ड्यांभोवती आज शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून प्रतिकात्मक पद्धतीने सजवून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी पुथ्वीराज सोनवणे ,निलेश पाटील, राहूल नेतलेकर, सोहम विसपुते, हितेश शहा, चेतनप्रभु देसाई, बाळू बाविस्कर, मंगला बारी, निलू इंगळे, विजय राठोड, लोकेश पाटील, संतोष रायचंदे, विजय चौधरी, विजय अभंगे, नितीन तामयचे, बजरंग सपकाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content