सुशील टाटीया यांचे निधन

 

चोपडा, प्रतिनिधी । सकल जैन समाजाचे कार्यकर्ते ,श्री.वर्धमान जैन स्थानकवासी श्री संघचे जेष्ठ सद्स्य,चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे कार्याध्यक्ष,सुधर्म मंडळाचे महाराष्ट्र सदस्य, जैन मायनॉरीटीचे प्रदेश सदस्य, एन. एम. टाटीया ट्रस्टचे सचिव गहेना घर या सोन्याच्या पिढीचे संचालक सुशिल सोहनराज टाटीया वयाच्या ५४ व्या वर्षी दि.२१ रोजी सकाळी ८:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक (जैन) आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

सुशील टाटीया यांनी जैन धर्माचे प्रचारक म्हणून स्वाध्यायी बनून कित्येक वर्षे काम केले आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून देखील काम केले आहे. रोटरँक्ट क्लबचे प्रांतपाल, प्रखर वक्ता, प्रसिद्ध सूत्रसंचालक ,लेखक,शाहाकार प्रचारक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते नेहमी सामाजिक कामात अग्रेसर होते. त्यांचे वडील सोहनराज टाटीया हे मागील २२ वर्षांपासून श्री.वर्धमान जैन स्थानकवासी श्री संघाचे अध्यक्ष होते तसेच त्यांची आई कै. सुरजबाई सोहनराज टाटीया यांचे देखील काही वर्षांपूर्वीच २१ दिवसाचा संथारा मरण आले होते अश्या धार्मिक वृत्तीचा परिवार आहे

Protected Content