डंपर चालकाला आगाऊपणा आला अंगलट ; संशयावरुन डंपर पकडले

 

रावेर, प्रतिनिधी । गौण खनिज वाहतुक करणाऱ्या डंपर चालकाला आगाऊपणा चांगलाच भोवला आहे. महसूल पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीच्या संशयावरुन मध्य प्रदेश पासिंग डंपर पकडले असून मागील पाच दिवसांपासुन तहसिल कार्यलायत उभे आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका ठेकेदाराचे डंपर रावेर तालुक्यातील पूरी-गोलवाडे परिसात रस्त्याचे काम करत होता. दरम्यान डंपर मालकाला न सांगता मध्य प्रदेश पासिंगचे MP 47 एच 0160 वरील डंपर चालकाने रावेर शहरात एका खाजगी बांधकाम करणाऱ्या ठिकाणी मुरुम आणून टाकाला. परंतु, त्यावेळी ते डंपर महसूल पथकाच्या नजरेतुन वाचले. परंतु दुसरी ट्रिप मुरुमची खाली करण्याच्या उद्दीष्टाने रावेर आला असता संबधीत मुरुमने भरलेले डंपर महसूल पथकाने पकडुन धडाकेबाज कारवाई केली आहे. मागील पाच दिवसांपासुन डंपर तहसिल कार्यालयात उभे आहे. अश्या पध्दतीने डंपर चालकाने केलेला आगाऊपणा चांगलाच अंगलट आला आहे.

Protected Content