पुण्यात भाजपला धक्का; सुनील माने यांचा शरद पवार गटात प्रवेश

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील राजकारणात शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. पुण्याचे माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आज २० मार्च रोजी सकाळी मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी सुनील माने यांचा शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश सोहळा पार पडला.

सामाजिक, राजकीय, पत्रकारितेतील माझ्या अनुभवाचा पुणे शहर आणि राज्याच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले. माने यांच्यासह माजी नगरसेवक आरिफ बागवान, माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांनीही शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप,पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी लिगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.

Protected Content