भारतीय जनता पक्षात अल्पसंख्याक युवकांचा प्रवेश

WhatsApp Image 2019 10 07 at 7.18.44 PM

जळगाव, प्रतिनिधी | आज (दि. ७ ) रोजी ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक युवक व भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (आ.), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार व शहराचे आ. सुरेश दामू भोळे यांच्या प्रचाराला उद्या दि. ८ ऑक्टोंबर मंगळवार पासून सुरुवात होणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारने अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी शिक्षण क्षेत्रात व त्यांच्या जीवनमान उंचवन्यासाठी उलेखनीय कार्य केले आहे. केंद्रातील व महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याने याच कार्याला प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय या कार्यकर्त्यांनी दि. ६ ऑक्टोंबर रविवार रोजी सायंकाळी ७ वाजता जीएम फाउंडेशन येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृतावर विश्वास ठेऊन या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यांना पक्षाचा गमछां घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
पक्षामध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते पुढील  प्रमाणे : प्रा. रफिक शेख, जळगाव जिल्हा अध्यक्ष गुलाबराव भदाणे , जळगाव जिल्हा उपाध्यक्ष शांताराम चुडामण गावंडे, सागर पाटील, जरीयान सैय्यद, फरदीन सय्यद, अतुल वानखेडे, योगेश पाटील, ललित क्षीरसागर, विजय सैनी, मेजर रफिक शेख, दानिश पाटील, गौरव सूर्यवंशी, वैभव पाटील, आनस देशमुख, राहील शेख, सौरभ पाटील, भाग्येश त्रिपाठी, सारंग मराठे, पियुष पाटील, आणि सर्व विद्यार्थी वर्ग, अब्दुल शेख मसूर, सबीर शेख अजीज, मो.अली सै.आरिफ, मो.शाह सै.शरीफ, मो.मुस्तफा सै.शरीफ, सरफराज, शेख जाकीर, अजहर शेख अमीन, शारुख सिराज भिसती, शातेन शेख अमित, फैजल खुदाबक्ष भिस्ती, सौहील खान नैयर खान, फहीम खान, रहीम खान, शेख रईस शेख लतीफ, तौसीफ शेख रसीद शेख, असिफ शेख युसुफ शेख संजय कृष्ण पाटील, मिलिंद पुंडलिक जोशी, प्रफुल भैया साहेब देशमुख, सरिता नंदकिशोर मेरे, भूषण गुलाबराव भदाणे, उर्मिला संजय खैरनार, वंदना संजय कडस्कर, संजय बारसू कडस्कर, अनिता ओम कश्यप आदींनी प्रवेश केला. महानगरचे अल्पसंख्यांक अध्यक्ष इरफानभाई नुरी तसेच नगरसेविका तसेच भटक्या विमुक्त महानगर अध्यक्ष  पार्वता भिल यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आला.

Protected Content