काँग्रेसकडून नंदुरबारमधून पाडवी तर धुळ्यातून पाटील

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून यात धुळ्यासाठी कुणाल पाटील तर नंदुरबारमधून के.सी. पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसने आज ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात धुळ्यासाठी कुणाल पाटील तर नंदुरबारमधून के.सी. पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांमध्ये वर्धा येथून चारूलता टोकस, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड, शिर्डी राखीवमधून भाऊसाहेब कांबळे तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा समावेश आहे. उर्वरित दोन उमेदवार केरळमधील आहेत.

Add Comment

Protected Content