Home राजकीय भाजप नरमली ? ; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार !

भाजप नरमली ? ; शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार !

0
106


0Shivsena Bjp 45

मुंबई प्रतिनिधी । एकीकडे महाविकास आघाडी आकारास येत असतांना आता भाजपने नरमाईची भूमिका घेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. दैनिक लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

दैनिक लोकसत्ताने आज गौप्यस्फोट करून भाजपने नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती दिली आहे. या वृत्तानुसार आता भाजप नेतृत्वाने पहिल्या अडीच वर्षासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली आहे. एका ज्येष्ठ नेत्याच्या माध्यमातून हा निरोप मातोश्रीपर्यंत पोहचवण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, याबाबत भाजप अथवा शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही नेत्याने अद्याप आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. यामुळे या दाव्याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे. अर्थात, या वृत्ताने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे आज सत्ता स्थापनेसाठी घडामोडींना प्रचंड वेग येणार असल्याचेही आधीच अधोरेखीत झाले आहे.

दरम्यान, ताज्या वृत्तानुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र शिवसेनेला पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट करून या वृत्ताचा दावा फेटाळून लावला आहे.


Protected Content

Play sound