भुसावळ, प्रतिनिधी | आज सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी ” लोणारी मंगल कार्यालय”जळगाव रोड भुसावळ येथे भारतीय जनता पक्षाची सीएएच्या समर्थन मोर्चा नियोजन संर्दभात बैठक घेण्यात आली.
सीएएच्या समर्थन मोर्चासंदर्भातील बैठकीत भारतीय जनता पक्षाचे आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डाॅ सुनिल नेवे यांनी सीएए समर्थनार्थ मोर्चा बाबतीत मार्गदर्शन केले. मोर्चामध्ये सर्व समाजाच्या लोकांना सीएए कायद्याबाबतीत खरी परिस्थीती सांगुन जास्तीत संख्या आणुन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे व सरचिटणीस पवन बुंदेले व रमाशंकर दुबे, नगरसेवक मुन्नाभाई तेली, युवराज लोणारी किरण कोलते, बोधराज चौधरी, निक्की बत्रा, किशोर पाटील, वसंत पाटील, देवा वाणी, राजु नाटकर, गिरीष महाजन, सतीश सपकाळे तसेच युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष सुमीत बऱ्हाटे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पाटील, प्रमोद सावकारे, प्रशांत पाटील, दिपक धांडे, खुशाल जोशी, अमोल महाजन, अनिरुध्द कुलकर्णी, नारायण रणधीर, सुनील सोनवणे, सचिन नवगाळे, नंदु बडगुजर, पुंडलिक पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.