जिल्हा कोवीड रूग्णालयातील समस्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचे रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. असे संकट असतांना जिल्हा कोवीड रूग्णालयात मात्र रूग्णालयात रूग्णांसाठी सोईसुविधा उपलब्ध नसल्याचे कोरोनाबाधितांना अनेक अडचणींची सामना करावा लागत असल्याचे निवेदन लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा कोवीड रूग्णालयात २ जून २०२० रोजी बेपत्ता झालेली कोरोनाबाधित वृध्द महिला तब्बत आठ दिवसांनी एका शौचालयात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत वृध्देला अद्याप न्याय मिळालेला नाही. जिल्हाधिकारी यांनी स्थापन केलेल्या डेथ ऑडिट कमिटी निष्कर्षांची अंमलबजावणी करावी, प्रत्येक पाच रूग्णमागे एक डॉक्टर नियुक्त करावा, मेट्रन, असिस्टंट मेट्रण, टेक्निशियन, कॉम्प्यूटर ऑपरेटर, फार्मासीस्ट असे अनेक पदे रिक्त असून ती भरावीत, रूग्णालयात एबीजी मशीन उपलब्ध आहे मात्र टेक्नीशीयन उपलब्ध नाही. ग्ल्यूकोमीटर उपलब्ध करून देणे, सेंट्रल मेडीकल गॅस सीस्टीम सुरळीत करावा, शासकीय मेडिकल कॉलेज मधील सेंट्रल कम्युनिकेशन सिस्टीम सुरू करणे, इमर्जन्सी संपर्काची सुविधा उपलब्ध करून देणे, जिल्हा कोवीड रूग्णालयात १० रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे यासह इतर मागण्या प्रतिभा शिंदे यांनी दिलेल्यानिवेदनात केले आहे. या निवेदनावर लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, प्रमोद पाटील, मुकुंद सपकाळे, राजेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content