डीजे बंद करण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सिम गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या ओट्यावर डी.जे.वरील संगीत बंद करण्याच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून ग्रामपंचायतीच्या भिंतीवर डोक्यातून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवेंद्र उर्फ पप्पू दिलीप पाटील रा. वराडसीम ता. भुसावळ हे तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता गावात डीजे वाजवण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी निलेश पाटील याने डीजे बंद करण्याच्या कारणावरून गावात राहणारे महेश प्रेमदास जाधव, मनोज रवींद्र साळवे, पवन पानपाटील, आकाश अनिल सपकाळे, विशाल इंगळे आणि अजय साळवे सर्व रा. वराडसीम ता. भुसावळ यांनी बेदम मारहाण करून देवेंद्र पाटील यांचे डोके ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीला आटोपून गंभीर दुखापत दुखापत केल्याची घटना घडली आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यानुसार मंगळवार १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता
महेश प्रेमदास जाधव, मनोज रवींद्र साळवे, पवन पानपाटील, आकाश अनिल सपकाळे, विशाल इंगळे आणि अजय साळवे सर्व रा. वराडसीम ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content