उमाळा फाटा येथून पार्किंगला लावलेल्या कारची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा फाटा येथून पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, साकीब अली सैय्यद जाकीर अली (वय-२२) रा. मकरा कॉलनी, कुसुंबा शिवारात ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे (एमएच ०४ जीडी ८२१९) क्रमांकाची टाटा इंडिगो कार आहे. शनिवारी १८ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता त्यांनी त्यांची कार कुसुंबा फाट्याजवळील औरंगाबाद-जळगाव रोडवर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंग लावलेली ९५ हजार रुपये किंमतीची टाटा इंडिगो कार चोरुन नेल्याचा प्रकार रविवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला.
परिसरात शोधाशोध केली असता कार कुठेच आढळून आली नसल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. साकीब अली यांच्या फिर्यादीवरून फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहे.

 

Protected Content