हुडको येथे बंद घरातून चोरी; २० हजाराचा मुद्देमाल लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हुडको भिलवाडीच्या मागे मरीमाता मंदीरासमोरील एका घरात अज्ञात चोरटयांनी घरातील मंगळसुत्रासह पाण्याची मोटार चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश जगन्नाथ पाटील (वय-४२) रा. भिलवाडीच्या मागे हुडको हे आगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातूनचे आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. रविवारी १४ फेब्रुवारी रोजी देवळी ता. नाशिक नातेवाईकांकडे कार्यक्रम असल्यामुळे ते कुटुंबियासह घराला कुलूप लावून गावाला गेले. दरम्यान, याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातील टॉयलेटच्या खिडकीतून आत प्रवेश करत घरातील कपाटातीत ठेवलेले १५ हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र, ४ हजार रूपये किंमतीचे अगरबत्तीचा माल आणि १ हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार असा एकुण २० हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. सुरेश पाटील हे सायंकाळी ७ वाजता घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे. 

Protected Content