एम.जे. कॉलेजमध्ये इंपॅक्ट स्पर्धा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील एम.जे. कॉलेजमधल्या संगणकशास्त्र प्रशाळेतर्फे डॉ.जी.डी.बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर इम्पॅक्ट स्पर्धा उत्साहात पार पडली.

मू.जे. महाविद्यालयात संगणकशास्त्र प्रशाळेतर्फे डॉ.जी.डी.बेंडाळे राष्ट्रीय सॉफ्टवेअर इम्पॅक्ट स्पर्धा घेण्यात आली. यंदा ही स्पर्धा ऑनलाईन या प्रकारात पार पडली. याचे उदघाटन केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे व प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रा.हेमलता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा.उज्वला महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.स्वप्नाली वाघोदे यांनी आभार मानले.

या स्पर्धेत एम. एम.पॉवर स्मार्ट बेबी केअर सिस्टीम, पोलिस पर्सनल डिटेक्शन असे नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर सादर करण्यात आले. यामध्ये विद्या गणेश आग्रे (चिपळूण) हीने प्रथम, मु.जे.च्या विशाल नाना पाटील याने द्वितीय तर निकिता सुनील देवरे व कोमल अरविंद पाटील यांनी तृतीय क्रामांक पटकाविला.

बक्षीस वितरण महाराष्ट्र बॅकेचे झोनल मॅनेजर संदीप पोहे यांच्या हस्ते झाले. रसिका कुलकर्णी (पुणे), गीता चौधरी (डोबिवली) यांनी परीक्षण केले. प्रा. हेमलता पाटील, डॉ. लीना भोळे ,प्रा. स्वप्नाली वाघोदे, प्रा.उज्वला महाजन, प्रा. शुभांगी भंगाळे, अर्चना पाटील, प्रा. दीपाली खडके, राजेश सरोदे, सचिन कोल्हे, भूषण पाटील, मिलिंद पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content