तलवार घेवून दहशत माजविणार्‍या तरुणास अटक

jalgaon crime news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी मच्छी मार्केट परीसरात हातात तलवार घेवून दशहत माजविणार्‍या तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून तलवार जप्त करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पुनम दिपक साळुखे, (वय 29) वर्ष, रा. सुप्रीम कॉलनी, नवनाथ नगर या तरुणास गुरुवारी सायंकाळी 6.20 वाजता तरुण दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, महेंद्रसिंग पाटील, महेंद्र गायकवाड, पो.कॉ. सतिष गर्जे, गोविंदा पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. पथकाने तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 31 इंच लांब, त्यात सुमारे 06 इंच लांबीची पिवळया धातुची मुठ, तसेच सुमारे 25 इंच लांबीचे व 1.5 इंच रुंदीचे लोखंडी पाते असलेली एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

Protected Content