धानवड येथे किरकोळ कारणावरून मायलेकाला मारहाण ; चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवड येथे शेतीच्या कारणावरून दोन दिरानी व जेठानी यांचे शाब्दिक सुरू असतांना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील धानवड येथील रहिवाशी सरला दिलीप पाटील (वय-३८) रा. धानवड ता.जि.जळगाव यांचे आणि दीर व दिरानी यांच्या २० जून रोजी रात्री ११.३० वाजता शेतीच्या कारणावरून आपापसात बोलचाल सुरू होती. असे असतांना निवृत्ती काशीनाथ पाटील रा. धानवड ता.जि.जळगाव हा एवढ्या रात्री का भांडतात असे विचारल्यावरून सरला पाटील यांनी आमचे घरघुती भांडण आहे. असे सांगितल्याचा राग आल्याने निवृत्ती पाटील, सोपान काशीनाथ पाटील, काशिनाथ सिताराम पाटील आणि कमलबाई काशीनाथ पाटील सर्व रा. धानवड ता.जि.जळगाव यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तर निवृत्ती पाटील याने सरला पाटील यांचा मुलगा योगेश पाटील याला वखरची पास हातावर मारली. यात दोन जण जखमी झाले आहे. सरला पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पवार करीत आहे. 

Protected Content