भुसावळ येथे पंतप्रधान विकास समृद्धी केंद्राचे उद्घाटन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । भुसावळ येथे कृषी विभाग केंद्रीय तथा राज्य शासनाच्या योजनेच्या पंतप्रधान विकास समृद्धी केंद्रचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आमदार संजय सावकार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा. यासाठी पंतप्रधान किसान विकास समृद्धी केंद्र स्थापन केले जाणार आहे. भुसावळ येथे या विकास समृद्धी केंद्राचे भूमिपूजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते करण्यात आले. सेतू केंद्राप्रमाणेच किसान विकास समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व या योजनांबद्दल शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या केंद्राच्या माध्यमातून सोडवल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ योजनेचा लाभ घेणे शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वायकोळे यांच्यासह विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

Protected Content