भुसावळ शहारात कोम्बिंग ऑपरेशन : तिघांना अटक

भुसावळ, प्रतिनिधी  । शहरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. २१  मेच्या रात्री ११ वाजेपासून दि. २२ मेच्या  पहाटे ४ वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात तिघांना अटक करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर  नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती मिळावी यासाठी  हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात  आले. हे कोम्बिंग ऑपरेशन  रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळावी, रेकॉर्डवरील हिस्ट्री सीटर चेक करणे, रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार चेक करणे, तसेच गुन्हेगारांवर निगराणी ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान  विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना वॉन्टेड असणारे १८  गुन्हेगार चेक केले. त्यापैकी ३ आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले. रात्रीच्या वेळी ३ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा करण्याच्या उद्देशाने व संशयितरित्या फिरणाऱ्या तिघा व्यक्तींना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पैकी २  गुन्हे हे शहर भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून १  गुन्हा बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे.  महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 खाली तडीपार करण्यात आलेल्या एकूण आठ गुन्हेगारांना चेक करण्यात आले. ते घरी मिळून आले नाही.  एकूण 14 हिस्ट्री सीटर चेक करण्यात आले. त्यांना चांगल्या वागणुकीची समज देण्यात आली. एका हॉटेलवर  रात्री उशिरा सुरु ठेवल्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33, w प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.  ९  जेल रिलीज गुन्हेगार चेक केले असता त्यापैकी ३ आरोपिंवर प्रतिबंधक कारवाई केलेली नसल्याचे दिसून आल्याने त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. Ipc 188 खाली भुसावळ शहर पोलिसात एक गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी  सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक श्री. भागवत, बाजारपेठ, पोलीस निरीक्षक श्री. ठोंबे, भुसावळ शहर पोलीस स्टेशन तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, कृष्णा भोये, गणेश धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगुहू तसेच दोन्ही पोलीस स्टेशनचा स्टाफ, पोलीस मुख्यालय येथील एक RCP पथक यांनी केली.

 

Protected Content