हिरकणी महिला मंचमुळे महिलांना आधार मिळेल : ॲड. भारती मुजुमदार

 

भुसा‌वळ, प्रतिनिधी । समाजात व्यसनाधिनता वाढल्याने विविध गुन्हे घडत आहेत. यात महिलावरील अत्याचारात वाढ झाली आहे. या अत्याचारग्रस्त महिलांना विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आधार दिला पाहिजे. तेच  कार्य  हिरकणी महिला मंचमुळे शक्य झाले झाल्याचे गौरोद्गर अॅड. भारती मुजुमदार यांनी काढले.

आर्या फाऊंडेशन संचलित हिरकणी महिला मंचचे उद्घाटन समारंभ नुकताच भुसा‌वळातील पांडूरंग टाॅकीज मागील बालाजी मंदिराजवळ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. भारती मुजुमदार, प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीच्या प्रा. रश्मी शर्मा, आर्या फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे, सचिव लता तायडे, राजश्री सुरवाडे तसेच आर्या फाऊंडेशनच्या मार्गदर्शक सुपडा तायडे या उपस्थित होत्या.

प्रास्ताविक आर्या फाऊंडेशनच्या संचालिका तथा अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य प्रा. मनीषा बाविस्कर यांनी केले. रोटरीच्या रश्मी शर्मा म्हणाल्या आजची प्रत्येक महिलाही परफेक्ट हिरकणी आहे. त्यांना फक्त त्यांच्यातील त्या गुणांची ओळख करून देणे गरजेचे आहे. संसार कुटुंब सांभाळात असताना स्वत:चे छंद, आवड निवड जपली पाहिजे. तसेच एका महिलेने दुसऱ्या महिलेविषयी आपुलकी प्रेम ठेवले पाहिजे. यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन चुकीच्या घडणाऱ्या घटनांना निश्चीतपणे आळा घालता येवू शकेल.

सामाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यासपीठ: डॉ. वाघचौरे
आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षापासून आर्या फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रअंतर्गत व्यासनमुक्ती अभियान राबवत आहे. हे राबवत असताना ग्रामीण भागात व्यसनाधिनतेमुळे उध्वस्त झालेले अनेक परिवार पहावयास मिळाले. या कुटुंबातील विधवा, घटस्फोटीत महिलांना परिवार चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गटाला समाजाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्या व्यक्तीमत्व विकास, रोजगार मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हिरकणी महिला मंच हे व्यासपीठ आहे.

याप्रसंगी हिरकणी महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष प्रा. निरंजना तायडे, उपाध्यक्ष सुवर्णा इंगळे, अॅड. मनीषा बाविस्कर, डॉ. वंदना तायडे, पौर्णिमा मसाने, सरोजिनी रामटेके, बबीता सिंग, अंजुम खान, विजय मोदी, मोनिका डॅनियल, मालती येवले, सुरेखा साळुंखे यांची निवड करण्यात आली.

यशस्वीतेसाठी करुणा मोरे, सुशीला बनसोडे, सुचित्रा पाटील, सुनंदा पाटील, नीलम वीग, कविता गरुड, भारती तायडे, ज्योती सुरवाडे, रीना सिंग, सुजाता सपकाळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन व आभार प्रा. निरंजना तायडे यांनी केले.

Protected Content