चिंचोली शिवारातील विहीरीत तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळला

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली शिवारातील एका विहिरीत एका २० वर्षीय तरूणाचा संशयास्पद मयतस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताचा एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

रितेश राजेंद्र घुगे (वय-२०) रा. नाशिक असे मयताचे नाव आहे. आज सकाळी चिंचोली शिवारात ललित घुगे यांच्या शेत शिवारातील विहिरीत आज सकाळी ६ वाजेच्या पुर्वी रितेशचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताचा एमआयडीसी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान तरूणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीस कसून चौकशी करत आहे.

Protected Content