नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपची हप्ता वसूली बनली आहे. असा आरोप सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला. इलेक्टोरल बाँडव्दारे भाजप मोठया कंपन्याकडून पैसा घेऊन भाजप हप्ता वसूलाचा धंदा करत आहे असे प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. इलेक्टोरल बाँडच्या प्रकरणाच्या तपासणीसाठी एसआयटी स्थापन व्हावी, अशी मागणी भूषण यांनी केली.
४१ उद्योगसमूहांनी भाजपला इलेक्टोल बाँडच्या माध्यमातून दोन हजार ४७१ कोटी रूपयांचे बाँड मिळाले आहे. या ४१ उद्योगसमूहांवर तपास संस्थांनी छापे घातले आहे. यातील एक हजार ६९८ कोटी रुपये छापे पडल्यानंतर देण्यात आले होते. देणगी द्या – धंदा घ्या या पध्दतीच्या माध्यमातून भाजपला ३३ उद्योग समूहांनी बाँड दिले आहे. या ३३ उद्योगसमूहांनी एक हजार ७५१ कोटी रुपये भाजपला मिळाले आहे. याव्यतिरिक्त एक हजार तर संबंधित समूहांना तीन लाख ६९ हजार ९४७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. ३० बोगस कंपन्यानी भाजपला १४३ कोटी रूपये मिळाले आहे. ४९ प्रकरणे अशी आहेत की, ज्यात देणगी दिल्यावर मोठमोठी कंत्राटे देण्यात आली आहेत. अशा प्रकरणांत पक्षाला ५८० कोटी रुपये मिळाले तर देण्यात आलेल्या कंत्राटाचे मूल्य तब्बल ६२ हजार कोटी रुपये इतके आहे. १२ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा हिशोब समोर आलेला नाही. ही सर्व माहिती प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.