आदर्श शिक्षक भावसार सरांनी गौरव चौधरी यांचा केला सन्मान

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा  शहरातील रहिवासी व सध्या शिरपूर येथे वास्तव्यास असलेले गुण ग्राहक व्यक्तिमत्त्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी शहादा येथील गौरव राजेश चौधरी याने एम् एस् (एम् फार्म) पदव्युत्तर परीक्षेत लंडन येथील ग्रीणविच विद्यापीठात द्वितीय क्रमांकाचे रौप्य पदक पटकावल्याबद्दल त्यास आपल्या निवासस्थानी बोलावून गौरव पत्र व रोख बक्षीस रुपये दोनशे पन्नास मात्र देऊन सन्मानित केले.

पुढील वाटचाल व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व अनेकोत्तम शुभ आशीर्वाद दिले. गौरव व त्याचे कुटुंबीय यांनी भावसार सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले. भावसार सरांनी आजपर्यंत १०२८ यशवंत विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित केले आहे

 

Protected Content