ओडीशामध्ये भाजपची मोठया पक्षासोबत जागावाटपावरून युती तुटली

भुवनेश्वर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडीशामध्ये लोकसभेच्या निवडणूकांसोबतच विधानसभेच्या निवडणूकाही होणार आहेत. अशातच भाजप आणि ओडिशामध्ये २४ वर्षापासून सत्तेत असलेला नवीन पटनाईक यांचा पक्ष बीजू जनता दल (बीजेडी) यांच्या युतीची चर्चा सुरू होती.

भाजप आणि बीजेडी यांचा जागावाटपाची वाटाघाटी सुरू होत्या. मात्र अचानक भाजप हा ओडिशामध्ये स्वबळावर निवडणूका लढवणार आहे अशी माहिती राज्यप्रमुख मनमोहन सामल यांनी दिली. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, बीजेडी ही स्वबळावर ओडीशामध्ये निवडणूका लढवणार आहे.

ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागा आहेत. यातील लोकसभेच्या १४ जागा लढवण्याची इच्छा भाजपने व्यक्त केली होती. ही भाजपची मागणी बीजेडीने फेटाळली. त्यामुळे जागावाटपाच्या संघर्षामुळे ही युती न होताच तुटली. आता भाजप ओडिशातील लोकसभेच्या सर्व २१ जागा आणि सर्व १४७ विधानसभेच्या जागा लढवणार आहे. ओडिशा राज्यात १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून या चार टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत.

 

Protected Content