भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून स्थानिक शेतकऱ्यांना धीर देत अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी जळगाव पुर्व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी यावेळी केले.
गारपीट व अवकाळी पावसामुळे चहार्डी परिसरातील हातेड रस्त्या वरील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन त्यात कांदा, दादर, मका, गहू ,टमाटर, लिंबू या पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना बांधा वरूनच जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी तहसीलदार बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर पंचनामा करण्याचे सांगितले.
या वेळी जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके,भारतीय जनता पार्टीचे गोविंद सैंदाणे, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, प्रदीपभाऊ पाटील, धनंजय पाटील,गजेंद्र सोनवणे, दिपक बावीस्कर, जीवन पाटील, रोहिदास पारधी, कांतीलाल पाटील,संदीप पाटील, हनुमंत महाजन, सोनू भादले, प्रकाश पाटील, वेडू दोधु पाटील, वैभव पाटील, पिंटू पाटील यांच्या सह स्थानिक शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.