धरणगावच्या उपनगराध्यक्षपदी कल्पना महाजन यांची बिनविरोध निवड

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कल्पना विलास महाजन यांची आज बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

अंजली भानुदास विसावे यांनी २२ मे रोजी आपला राजीनामा नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याकडे सोपवला होता. तत्कालीन पालिका उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी पक्ष आदेशाने ठरल्यानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आपला राजीनामा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख शिवसेना गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याकडे सादर केला होता. सौ.विसावे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. दरम्यान, आज सकाळी ११ वाजेपर्यंत दुसरा कुणाचाही अर्ज न आल्यामुळे कल्पना महाजन यांची बिनविरोध निश्चित झाली आहे. कल्पना महाजन या शिवसैनिक विलास महाजन यांच्या धर्मपत्नी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी नगरसेवक भागवत चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पीठासीन अधिकारी म्हणून जनार्दन पवार यांनी काम पहिले.

Protected Content