आळेफाटा येथे ‘मविआ’च्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे स्वागत

पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांना संपवणारे सरकार आहे अशी जोरदार टीका विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आळेफाटा या ठिकाणी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज बुधवार पासुन काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आळेफाटा या ठिकाणी आल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,राष्ट्रवादी क्रॉग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बापु शेवाळे, उध्दव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, उपजिल्हा प्रमुख सुरेश भोर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, तुषार थोरात, तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे,जगन्नाथ शेवाळे, शरद लेंडे, ॲड.विजय कु-हाडे,प्रसन्न डोके, मंगेश आण्णा काकडे,अशोक घोडके,सुरेश गडगे,अशोक सोनवणे, निलेश शिंदे,गणेश गुंजाळ,रविंद्र गुंजाळ,सुरेखा वेठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वडगाव आनंद उपसरपंच ऋषिकेश गडगे, वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी उपाध्यक्ष प्रमोद गडगे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गडगे, बारकू गडगे, माजी उपसरपंच सुरेश शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये दाखल झाले होते.

यावेळी शेरकर म्हणाले खासदार डॉ. कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असता या सरकारने त्यांना निलबिंत केले. त्यामुळे ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी खासदार कोल्हे यांनी सांगितले की केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याला बाजारभावच मिळत नसल्याने ही बंदी उठवावी निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, तालुक्यात बिबट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असुन शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा द्यावी.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असुन त्याची भरपाई मिळावी , खतांचे वाढलेले दर कमी करावेत अश्या विविध प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मागण्या या वेळी मांडल्या. याप्रसंगी शेतकरी आक्रोश मोर्चाचे स्वागत व प्रास्ताविक जयवंत घोडके यांनी केले. आभार अनंतराव चौगुले यांनी मानले.

Protected Content