खासदार राऊत यांचे पारोळा शहरात स्वागत

पारोळा प्रतिनिधी । शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे परतीच्या मार्गावर असतांना पारोळा येथे त्यांचे कजगाव चौफुलीवर जोरदार स्वागत करण्यात आले.

१२ रोजी खासदार संजय राऊत हे मुंबईकडे परतीच्या मार्गावर असताना खासदार राऊत यांनी प्रथम आमदार चिमणराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी बाजार समिती सभापती अमोल पाटील, माजी नगराध्यक्षा नलिनी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर कजगाव चौकात त्यांचे नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी स्वागत केले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अण्णा चौधरी, आरपीआयचे राजू जावरे, दयाराम मोरे, बबलू माने, किशोर पाटील, सुरेश पाटोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, खासदार संजय राऊत हे कार्यकर्त्यांकडून स्वागत, सत्कार स्वीकारत असताना अचानक कपिल वाघ (वय २३) या तरूणाने थेट राऊत यांच्या कारवर चढून घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ गोंधळ उडाला. अखेर या तरूणाला पोलिसांनी खाली उतारल्यानंतर राऊत हे धुळ्याकडे रवाना झाले.

Protected Content