पाडळसे येथील उपसरपंचाचा ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपात प्रवेश

यावल/भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २३ जानेवारी रोजी यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायत मध्ये नाट्यमय घडामोडी घडत गावातील उपसरपंचासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.

या राजकीय घडामोडीत पाडळसा ग्रामपंचायतच्या उपसरपंच अलका रघुनाथ कोळी तसेच ग्रामपंचायत सदस्य तुषार भोई, मयूर कोळी, पांडुरंग कोळी, गणेश कचरे यांच्या सहकार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिली. ग्रामपंचायत सदस्यांच्या या राजकीय प्रवेशामुळे पाडळसा गावातील वातावरण भाजपामय झालेले दिसून आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, हिरालाल चौधरी, नारायण बापू चौधरी, उज्जैन सिंग राजपुत, देविदास नाना पाटील, उमेश फेगडे, राकेश फेगडे, विलास चौधरी, पांडुरंग सराफ, यशवंत तळेले, दिनेश पाटील, उमेश पाटील,सागर महाजन, योगीराज बऱ्हाटे, राखी बऱ्हाटे, भारती चौधरी, कांचन फालक,सविता भालेराव ,गोटू चौधरी,दिपक पाटील,दिपक चौधरी, नितीन तायडे, अतुल भालेराव, निलेश गढे, तेजस पाटील, हेमराज फेगळे, लहू पाटील, धनंजय फेगळे, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content