लोकसभा निवडणुकीसाठी पाचोरा मतदार संघाची अंतिम संक्षिप्त यादी जाहीर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा मतदारसंघाची लोकसभेच्या निवडणुकीसाठी संक्षिप्त पुनरिक्षण अंतिम मतदार यादी २३ जानेवारी २०२४ जाहिर करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी भुषण अहिरे यांनी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. यावेळी पाचोरा – भडगाव तालुक्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष यांना बोलवण्यात आले होते. याप्रसंगी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान, पाचोरा भाजपा शहर अध्यक्ष दिपक माने, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, शहर अध्यक्ष मुन्ना परदेशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पप्पु राजपूत, राजेंद्र राणा, नाना वाघ, संतोष पाटील, प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार रणजित पाटील, उमेश वाडेकर उपस्थित होते.

मा. भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यांद्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी २३ जानेवारी २०२४ रोजी पाचोरा १८ विधानसभा मतदार संघात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी भुषण अहिरे यांनी दिली. १८ पाचोरा विधानसभा मतदार संघात ३ लाख १६ हजार ७२६ पात्र मतदार असुन यात १ लाख ६४ हजार ६८८ (पुरुष), १ लाख ५२ हजार ३२ (महिला), १ हजार ४७५ (दिव्यांग), ६ (तृतीयपंथी), २ हजार ३९ (सैन्य दलातील मतदार) समाविष्ट आहेत. यात ८० वर्षांपेक्षा जास्त उमेदवार ९ हजार ५५५ मतदार असुन या यादीत नविन ९ हजार ८६ मतदार जोडले गेले आहेत. ४ हजार ४२० मतदार मागील पाच वर्षांत मयत झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाचोरा प्रशासन सज्ज झाले असुन ३३२ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असुन यासाठी प्रशासनाचे २ हजार ७५३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी भुषण अहिरे यांनी यावेळी दिली.

Protected Content