सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी| खरीप हंगामात वितरणास्तव महाबिजमार्फत उशिरा रब्बी किंवा उन्हाळी २०२१-२२ हंगाम सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

वितरणास्तव महाबिजमार्फत उशिरा रब्बी किंवा उन्हाळी २०२१-२२ हंगाम सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधता यावे. यासाठी खालील संपर्क क्रमांकावर (८६६९६४२७२२) संपर्क साधून आपले आरक्षण नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी केले आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन फुलेकीमया, फुलेसंगम, एम.ए.यु.एस-६१२  हे वाण अनुदानावर मिळणार आहे. या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरीच बियाणे मिळण्यास पात्र राहणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी कळविले आहे.

Protected Content