धरणगाव तालुक्यासाठी पाटाच्या पाण्याच्या आवर्तन सोडण्याची भाजपाची मागणी

dharangaon nivedan

धरणगाव, प्रतिनिधी | रब्बी हंगाम सुरू होऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र पाटबंधारे विभागाकडून धरणगाव तालुक्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यास सुरुवातही झालेली नाही. शेतकरी आवर्तन सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तरी पहिले आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी भाजपाने आज (दि.७) येथील तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

येथील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, यापूर्वी दि.१९ जुलै २०१८ रोजी धरणगाव पिंपळे रस्त्यावरील मेन कॅनॉलवर नवीन पुल व संरक्षक कठडे तसेच पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करणेबाबत निवेदन दिले होते. परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही, तरी कार्यवाही व्हावी.

निवेदन देताना जेष्ठ कार्यकर्ते अॅड. वसंतराव भोलाने, पुनीलाल महाजन, भाजपा गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शहरअध्यक्ष सुनील वाणी, सरचिटणीस सुनील चौधरी, भाजपा शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष दिलीप महाजन, सुदाम मराठे, राजू महाजन, कन्हैय्या रायपूरकर, विजय महाजन, युवामोर्चा शहराध्यक्ष कांतीलाल माळी, युवामोर्चा सरचिटणीस सचिन पाटील, योगेश माळी, मयूर महाजन तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी व कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Protected Content