अमोल दुध पावडर परस्पर विकणाऱ्या ठगास अटक

chalisgaon crime news

जळगाव प्रतिनिधी । मेहसाणा येथून विशाखापट्टम येथे पोहचविण्यासाठी 950 गोण्या सुमारे 31 लाख 17 हजार रूपये किंमतीचे अमोल दुध पावडर परस्पर विक्री करणाऱ्या ठगास गुजरात येथून अटक केली आहे. पुढील तपासकामी संशयित आरोपीस चाळीसगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, 21 ते 26 सप्टेंबर 2013 दरम्यान संशयित आरोपी राजेंद्र अमरसिंग वाघेला वय-67 रा. गोध्रा गुजरात याला मेहसाणा येथून विशाखापट्टनम येथे 14 टन 500 किलो 950 गोण्या 31 लाख 17 हजार 758 रूपये किंमतीचे अमोल दुध पावडर पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र संशयित आरोपी राजेंद्र वाघेलाने हा माल विश्वासघात करून नियोजित ठिकाणी न पोहचविता चाळीसगाव कन्नड घाटात विक्री केली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांनी पथक तयार करून सफौ अशोक महाजन, पोहेकॉ रविंद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरु शेख, दादाभाऊ पाटील, दिपक पाटील, मुरलीधर बारी अशांचे पथक रवाना केले. गुजरात राज्यातील गोध्रा येथे वास्तव्यास असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर संशयित आरोपी राजेंद्र अमरसिंग वाघेला याला अटक केली.

Protected Content