मोबाईल टॉवरच्या साहित्यांची चोरी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरचे ८ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीला आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावातील शेत गट क्रमांक ११६ मध्ये एअरटेल कंपनीचे मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहे.या टॉवरला लागणारे ८ हजार रूपये किंमतीचे मॉडेल साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात कर्मचारी रविंद्र पाटील यांनी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content