शेतातून पीव्हीसी पाईपांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आसोदा शिवारातील शेतातून पीव्हीसी पाईपांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण रघूनाथ नेहते (वय-५५) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आसोदा शिवारात शेत गट क्रमांक १३३२-२ मध्ये शेत आहे. पिकांना पाणी सोडण्यासाठी त्यांनी शेतात पीव्हीसी पाईप ठेवलेले होते. २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शेतातील काम आटोपून ते घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात ठेवलेले १६ हजार ७५० रूपये किंमतीचे पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता किरण नेहते हे शेतात आल्यावर उघडकीला आले. मंगळवारी ४ जुलै रोजी दुपारी किरण नेहते यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.

Protected Content