जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. २७ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरात दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून आली नाही. याबाबत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तीन दिवसानंतर मंगळवारी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली, अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने कुठल्यातरी कारणासाठी पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे, या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील हे करीत आहेत.

Protected Content