गलवाडे, झाडी, भरवस गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यांची स्थापना झाल्यामुळे चोरट्यांचा कल आता ग्रामीण भागाकडे वळली आहे. मात्र ग्रामीण भागातही लोकसहभागाची संकल्पना रुजवत डीवायएसपी राकेश जाधव यांच्या प्रेरणेने आणि अशोक आधार पाटील यांच्या आधार फाउंडेशनच्या सहकार्याने गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी, भरवस व लोणपंचम या गावांमध्ये उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

 

नुकताच या कॅमेऱ्‍यांचा लोकार्पण सोहळा डीवायएसपी राकेश जाधव आणि आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. अमळनेर शहरातून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन व्हावे, या उद्देशाने  डीवायएसपी राकेश जाधव यांनी लोकसहभागातून सुमारे ७० टक्के भागात सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत नेमके त्याच ठिकाणी चोºयांच्या घटना घडत आहेत. शिवाय चोरट्यांचा कल ग्रामीण भागाकडेही वळला आहे. ग्रामीण भागात बैलजोडी, मोटारसायकल, शेती अवजारे, विद्युत मोटारी, घरफोडी आदी चोरीच्या घटना तसेच हाणामारी, मुलींची छेडछाड, निवडणुकीतील वाद आदी घटनांना आळा बसावा या उद्देशाने डीवायएसपी राकेश जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमेºयांची संकल्पना ग्रामीण भागात रुजविण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. शिवाय या संकल्पनेला अशोक आधार पाटील यांच्या आधार फाउंडेशनचे सहकार्य लाभले.

 

सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यांसाठी लागणारा निधी हा लोकवर्गणीतून जमा झाला आणि त्यातून गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी, भरवस व लोणपंचम या गावात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. वरील गावे ही मुख्य रस्त्यावर असल्याने चोरीच्या घटना घडू नयेत तसेच घटना घडल्याच तर गुन्हे शोधास मदत व्हावी म्हणून राकेश जाधव यांची संकल्पना, प्रेरणा आणि मार्गदर्शनाने गावातील नागरिकांनी साद देत लोकवर्गणी जमा करून कॅमेरे बसवून घेतले. भविष्यात तालुक्यातील सर्वच गावे ही टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेºयांच्या निगराणीखाली आणण्याचा राकेश जाधव यांचा मानस आहे. त्यासाठी नागरिकांनी लोकसहभागात पुढाकार घ्यावा आणि आपले गाव सुरक्षित करुन घ्यावे, असे आवाहन डीवायएसपी राकेश जाधव यांनी केले आहे.

 

 

सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यांच्या उद्घाटन सोहळ्याप्र्रसंगी झाडीचे सरपंच भुपेंद्र पाटील, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ,  गलवाडेचे किशोर पाटील, सदस्य व ग्रामस्थ, भरवस, लोणपंचमचे सरपंच अशोक विनायक पाटील, उमेश हिम्मतराव पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, रामचंद्र हरचंद पाटील, विजय  पाटील, पवनकुमार  पाटील, प्रमोद  पाटील, कपिल पाटील, विवेक पाटील, जयेश पाटील, अतुल पाटील, योगेश पाटील,  दयाराम ठाकरे, सुशील पाटील, उदय पाटील, गोपाळ पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, संजय मिस्तरी, महेंद्र पाटील, अशोक  पाटील, कुणाल पाटील, चेतन पाटील, गणेश देवरे, रवींद्र देवरे, महेश पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, सागर पाटील, सुरेश पाटील, तेजस पाटील, प्रकाश पाटील, प्रतीक पाटील, भूषण पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, गोटू पाटील, शरद पाटील, गोरख पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील, प्रवीण ठाकरे, ईश्वर पवार, अनिल पाटील, पंकज पाटील, समाधान पाटील, रंगराव पाटील, मंगेश पाटील, भिलालीचे लोकनियुक्त सरपंच महेंद्र राजपूत तसेच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष धीरज पवार व राजू पाटील आदी उपस्थित होते.

 

कोट –

अमळनेर शहर गुन्हेगारीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित व्हावा, यासाठी आता प्रयत्न सुरु आहेत. उपविभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कृती आराखड्यात (अबंधित ४० टक्के निधी) अद्याप या संकल्पनेची तरतुद केली नसेल त्या ग्रामपंचायतींनी या संकल्पनेचा समावेश करुन घ्यावा, आणि ही लोकहितार्थ चळवळ अधिक जोमाने रुजवावी, जेणेकरुन अमळनेर तालुका गुन्हेगारीमुक्त होण्यास मदत होईल. अमळनेर शहर ज्या संकल्पनेने गुन्हेगारीमुक्त होत आहे, त्याचप्रमाणे तालुकाही गुन्हेगारीमुक्त  व्हावा, या उद्देशाने सर्वांनी या संकल्पनेस पाठिंबा द्यावा.

-राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर

Protected Content