भारतीय जैन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद जैन

0

अमळनेर प्रतिनिधी । येथील श्‍वेता एजन्सीचे संचालक विनोद जैन यांची भारतीय जैन संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

नुकत्याच जळगाव येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सदस्य विनय पारख हे होते.तसेच याप्रसंगी राज्य सदस्य हरकचंद बोरा विजय दुगड आदींचीही उपस्थिती होती.भारतीय जैन संघटनेने आपले कार्य केवळ जैन समाजाप्रती मर्यादित न ठेवता, वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जोपासत, गेल्या ३३ वर्षांपासून संपूर्ण भारतामध्ये नैसर्गिक आपत्ती च्या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचा अनुभव या संस्थेकडे आहे.तसेच पाणी फाऊंडेशनच्या कार्यात जेसीबी व डीझेल पुरवून बळकटी देण्याचे कामदेखील या संस्थेने केले असून अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भरीव योगदान दिले आहे.

विनोद जैन हे याआधी संघटनेचे अमळनेर शहराध्यक्ष असताना त्यांच्या कडून भरीव कामगिरी पार पाडल्याने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण धुरा सोपवण्यात आली आहे.जिल्हाभरात नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांची फळी उभारून, बीजेएस च्या कार्यास जोमाने लागणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. सर्वत्र त्यांच्या निवडीने आनंद व्यक्त केला जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!