जून्या वादातून तरूणाला बेदम मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे एका तरुणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत मारवाड पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामकृष्ण साहेबराव धनगर (वय-२३, रा. बोहरा ता.अमळनेर) हा तरुण आपल्या तरुणा नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. सोमवार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रामकृष्ण धनगर हा घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून सुजित दिलीप कोळी रा. बोहरा ता.अमळनेर आणि आकाश कोळी रा. जैनाबाद जळगाव यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी यांनी बेदम मारहाण केली. तसेच आमच्या नादी लागू नको, नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर रामकृष्ण धनगर याने मारवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सूजित दिलीप कोळी आणि आकाश कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील तेली करीत आहे.

Protected Content